E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
नांदेडमध्ये नायब तहसिलदारावर वाळू माफियांचा हल्ला
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
नांदेड : जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत पोलीस प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली, तरी शनिवारी रात्री नायब तहसिलदाराच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला चढवला. रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घटनेची वाच्यता होऊ नये, याची काळजी महसूल व पोलीस विभागाने घेतली आहे.
नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील वाळू घाटांचा लिलाव प्रलंबित आहे. महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस यंत्रणेने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली, तरी त्यांची मुजोरी मात्र, कमी झाली नाही. सिडको, सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाया केल्या असल्या, तरी लिंबगाव, मुदखेड, भोकर, किनवट, हिमायतनगर, माहूर, नाळेश्वर, राहटी, शंखतीर्थ या भागातून अवैधरीत्या वाळू उपसा सुरूच आहे.
विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या व्यवसायात समावेश असल्याने कारवाया करताना प्रशासनही हतबल होत आहे. शनिवारी रात्री नांदेडचे नायब तहसिलदार स्वप्नील दिग्गलवार हे आपल्या पथकासमवेत वाडी पाटी येथे कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर वाळू माफियांनी दगडफेक केली. त्यांच्या समवेत दोन तलाठी, कौतवाल व पोलीस कर्मचारी होते.
दगडफेक केल्यानंतर संंबंधित वाळू माफियांनी पथकाने पकडलेला हायवा पळवून नेला. विशेष म्हणजे हायवा गाडी लातूर जिल्ह्याच्या पासिंगची होती.शहरातील असर्जन, विष्णुपुरी भागात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. त्याच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्यासाठी हे पथक गेले होते. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले, तरी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. घडलेल्या प्रकारानंतर नायब तहसिलदार स्वप्नील दिग्गलवार यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. तेेथे रितसर तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.
वाळू माफियांची मुजोरी वाढत चालली आहे. शनिवारच्या घटनेत आमच्या जीवाला धोका निर्माण झाला. आमचे नशीब बलवत्तर म्हणून आम्ही दगडफेकीतून वाचलो. कारवाई करण्यासाठी गेलेलो असताना जवळपास ५० ते ६० जणांच्या जमाव अचानक आमच्यावर दगडफेक सुरू केली. त्यावेळी पोलीस कर्मचारीही आमच्यासोबत होते. याबाबत तक्रार नोंदवली असून भविष्यात वाळू माफियांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- स्वप्नील दिग्गलवार, नायब तहसिलदार, नांदेड
Related
Articles
डीजेमुळे पारंपरिक वाजंत्री व्यवसाय अडचणीत; वादकांवर उपासमारीची वेळ
14 May 2025
गोदामांची साठवणूक क्षमता वाढवावी : रावल
11 May 2025
उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा
11 May 2025
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
09 May 2025
राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक
13 May 2025
कात्रज-कोंढवा भागात दोन वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा
12 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली